कासेगांव/संजय पवार : उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगे येथील हर्षवर्धन प्रशालेत ६६ वा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी प्रशालेतील विविध स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव विठ्ठलराव गरड, संस्था सदस्य श्रीमती पुष्पा लोंढे, विपुल गंभीरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रशालेत राबविण्यात येणाऱ्या मश्रृम करिअर अकॅडमी गायडन्स यश प्राप्त केलेल्या शुभम गवळी याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकाश माळी व सूत्रसंचालन श्रीमती पल्लवी दराडे यांनी केलं तर सुरेश शिंदे यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले. या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व पालक उपस्थित होते.
