शस्त्र घेऊन माजवली दहशत ! तरुण एमपीडीए अन्वये स्थानबध्द

shivrajya patra

सोलापूर : एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील सागर ऊर्फ मनिष शैलेश बेळमकर (वय-२३ वर्षे, रा. ७९ कुमारस्वामी नगर, एमआयडीसी, सोलापूर) याच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी ३० एप्रिल रोजी स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केले. त्यास ०१ मे रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले.

सागर ऊर्फ मनिष बेळमकर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, जबरी चोरी, खंडणी मागणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, धाकदपटशा करणे, दगडफेक करणे, घातक शस्त्रांनी धमकविणे अशा प्रकारे गंभीर स्वरुपाचे ०५ दखलपात्र व ०१ अदखलपात्र गुन्हा असे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल असल्याचं सांगण्यात आलंय.

सागर बेळमकर यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२४ मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल, अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली. त्यामुळे ही स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.


To Top