अपहृत बालिका; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षानं लावला गुन्ह्याचा छडा

shivrajya patra

सोलापूर : अल्पवयीन बालिकेस संशयीत आरोपी अभिषेक दत्तात्रय जमादार (रा. जुनी मिल चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर) याने अमिष दाखवून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल होता. फौजदार चावडी पोलिसांनी शोध घेतला, मात्र ते पोलिसांच्या हाती न लागल्याने हा गुन्हा अधिक तपासासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडं वर्ग केला. तपासीक अधिकारी पोलीस निरिक्षक महादेव पाडुरंग राऊत व त्याचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी आरोपी अभिषेक दत्तात्रय जमादार व अपह्यत मुलीस ३० एप्रिल रोजी भिवंडी येथे ताब्यात घेतले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडे BNS सन २०२३ चे कलम १३७ (२), १४३ प्रमाणे दिनांक. ०७ जुलै २०२४ रोजी दाखल गुन्ह्यात अपहृत बालिका व आरोपीचा तत्कालीन तपासीक अंमलदार यांनी शोध घेतला, मात्र उभयतांचा शोध न लागल्याने हा गुन्हा पुढील तपासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष येथे ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी वर्ग करण्यात आला होता.

हा गुन्हा तपासकामी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे गुन्हा वर्ग होताच अल्प कालावधीत तपासीक अधिकारी पोलीस निरिक्षक महादेव पाडुरंग राऊत व त्याचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपुर्वक तपास करून व तांत्रिक माहिती प्राप्त करुन घेऊन आरोपी अभिषेक दत्तात्रय जमादार व अपहृत मुलीस ३० एप्रिल रोजी रोजी ठाणे जिल्हा भिवंडीतील गणेश नगरातून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरीता फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर केले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) श्रीमती डॉ. दिपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरिक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोह/८४६ महादेव बंडगर, पोना/७७० अ. सत्तार पटेल, मपोशि/६४५ सुजाता जाधव, मपोशि/१७८८ उषा मळगे, चालक पोकॉ/७२४ दादा गोरे तसेच सायबर पोलीस ठाणे कडील पोह/६०१ प्रकाश गायकवाड, पोह/२०८ मच्छिद्र राठोड यांनी पार पाडली.

To Top