Type Here to Get Search Results !

जिल्हा खादीमुल हुज्जाज हज कमेटीच्या शफीक रचभरे यांच्या हज हाऊसमध्ये सन्मान

सोलापूर : यावर्षी हजला जाणाऱ्या पहिला भाविकांचा विमान रवाना झाला.  त्यावेळी त्या भाविकांचे हज कमेटी ऑफ इंडियातर्फे उत्तम स्वागत करून त्यांना मुंबईवरून मदीना येथे रवाना करण्यात आले.  त्यात सोलापूर जिल्हा खादीमुल हुज्जाज हज कमिटीचे सदस्य शफीक रचभरे यांचा हज हाऊसमध्ये विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी जाईंट सेक्रेटरी सी. पी. बख्शी, हज कमेटी ऑफ इंडियाचे प्रशासन अधिकारी शानवास,  उपप्रशासन अधिकारी  डॉ. सदाकत अली, नियाज़ अहमद साहब, सऊदी एयरलाइंस के अधिकारी तसेच मुंबई एयरपोर्ट अथॉरिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हा खादीमुल हुज्जाज हज कमेटीच्या सदस्यांनी आपल्या जिल्ह्यात हजला जाणाऱ्या भाविकांसाठी विविध शिबिरे आयोजन करून  त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्यांना खादीमुल हुज्जाज हज कमिटीच्या पदधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.