वाणिज्य शाखेत कांबळे सिद्धाराम बाळाप्पा यांने ७०.३३ टक्के प्राप्त करून पहिलं स्थान पटकाविले. हविनाळे सागर शाम ६३.०० टक्के प्राप्त करून दुसऱ्या तर क्षिरसागर पुजा ज्ञानेश्वर हिने तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली. या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपराव माने, मुख्य विश्वस्त जयकुमार माने, विश्वस्त स्वाती माने, प्राचार्य जयसिंग गायकवाड, पर्यवेक्षक वसंत गुंगे यांनी अभिनंदन केले.
यावेळी संस्थेचे मुख्य विश्रस्त जयकुमार माने यांनी प्रथम द्वितीय तृतीय या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. यावेळी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देतांना मेहनत अभ्यास तळमळ यातून यश मिळते. आपले यश आपल्या पुढील शैक्षणिक प्रगती करनारं ठरो अशा शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शक शिक्षकांचेही अभिनंदन केले. प्राचार्य जयसिंग गायकवाड सर्व विद्यार्थी-शिक्षकांचे यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी ज्युनिअर काॅलेज प्रमुख प्रा. संजय जाधव, प्रा. दादाराव डांगे, प्रा. हणमंत शिंदे, प्रा. दिपक शिंदे, प्रा. विजयकुमार वाळके, प्रा. विनोद थोरात, प्रा. राजीव निकम, प्रा. बंडोपंत बाबर उपस्थित होते.