सोलापूर : जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त हे बांधकाम कामगार योजनेत, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व खाजगी दलालांच्या संगनमताने कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. आजही करीत आहेत, म्हणून त्यांना बडतर्फ करून, खातेनिहाय चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
त्यामध्ये १.मध्यान्न भोजन २.मध्यान्न भोजनाची खोटी बिले देणे ३.सुरक्षारक्षक भरतीच्या यादीत घोळ करणे ४.सुरक्षा कीट वाटपात ठेकेदाराला बिले काढण्यास मदत करणे ५. गृहउपयोगी संचाची खुलेआम विक्री करणे ६.बेकायदेशीर गृह वस्तू शिबिरे भरविणे. ७.जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयात अपात्र महिला सुरक्षा गार्डची पैसे घेऊन भरती करणे. ८.बी.ओ.सी. डब्ल्यू. परवाना देण्यास प्रत्येकी 30, 000 रुपये प्रमाणे लाच घेणे यासह गंभीर आरोप करून १४ मागण्या करण्यात आल्या.
विष्णू कारमपुरी व अंगद जाधव यांनी माध्यमांशी बोलताना, याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास "न भूतो न भविष्यती" असं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
विष्णू कारमपुरी, अंगद जाधव, सोहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, लक्ष्मी गुंटला, राधिका मिठ्ठा, राणी दासरी, पद्मा मॅकल लक्ष्मीबाई इप्पा, प्रीती आडकी, सुमित भांडेकर, प्रसाद जगताप, शिवाजी पवार, गुलाब लालकोट, उस्मान शेख, मुन्ना शेख, हुजेर शेख आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
फोटो ओळ : सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त यांना बडतर्फ करा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले. यावेळी विष्णू कारमपुरी, अंगद जाधव, सोहेल शेख आदी दिसत आहेत.