जिल्ह्यात महाराजस्व अभियानात 77, 206 विविध दाखल्यांचे वाटप

shivrajya patra

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पुढाकारातून 126 महसुली मंडळापैकी 76 मंडळात समाधान शिबिरांचे आयोजन, उर्वरित मंडळातही शिबिरे प्रस्तावित.

एकही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी दाखल्याअभावी शैक्षणिक प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने गतिमान पद्धतीने शिबिरांचे आयोजन

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच विविध शासकीय योजना यांच्यासाठी लागणारे प्रमाणपत्र वाटप जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या महसुली मंडळात शिबिराच्या माध्यमातून करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सर्व संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना दिलेले होते. त्या अनुषंगाने दिनांक 25 मार्चपासून ते 21 मेपर्यंत 126 महसुली मंडळापैकी 76 महसुली मंडळात समाधान शिबिराचे आयोजन करून जातीचे दाखले, उत्पन्न, अधिवास, रहिवासी दाखले, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र व इतर दाखले असे एकूण 77 हजार 206 दाखल्यांचे वाटप करून विद्यार्थी व पालक यांची शैक्षणिक प्रवेशासाठी होणारी गैरसोय टाळण्यात प्रशासन यशस्वी होत आहे.

शैक्षणिक वर्ष सन 2025-26 ची सुरुवात माहे जून 2025 पासून होत आहे. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी आवश्यक जातीचे दाखले, उत्पन्न अधिवास रहिवास दाखले तसेच नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र व अन्य दाखले हे सर्व विद्यार्थी व पालकांना वेळेत मिळावे, यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली 11 तहसील कार्यालय व एक अप्पर तहसील कार्यालय यांच्या अंतर्गत असणाऱ्या 126 महसुली मंडळात समाधान शिबिरे आयोजन करून परिसरातील विद्यार्थी व पालकांना आपले वाटत केले जात आहेत. 

21 मेपर्यंत 76 शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले असून उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व पंचवीस मंडळात शिबिरे घेण्यात आलेली आहे, तर ज्या महसुली मंडळात अद्यापपर्यंत शिबिरे घेण्यात आलेली नाहीत, त्या मंडळाने शिबिरांचे आयोजन करून दाखले वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले आहेत.

01 ते 21 मे या कालावधीत महाराजस्व अभियानांतर्गत 2969 जातीचे दाखले,  18837 उत्पन्नाचे दाखले,  2279 आदिवासी दाखले,  2092 रहिवास दाखले,  2726 नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र तर 2666 इतर दाखले असे एकूण 31 हजार 569 विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. 

त्या प्रमाणेच 25 मार्चपासून ते एप्रिल अखेरपर्यंत एकूण 45 हजार 637 विविध दाखले वाटप करण्यात आलेले आहेत तर आज रोजीपर्यंत 77 हजार 206 विविध शालेय दाखल्यांचे वाटप करून जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

महसुली मंडळ स्तरावरच विविध दाखले वाटपाचे शिबिरे घेण्यात येत असल्याने शालेय विद्यार्थी व पालक समाधानी असून याच पद्धतीने प्रत्येक वर्षी शिबिरांचे आयोजन करावे. यातून शिबिराच्या ठिकाणी विविध दाखले मिळत असल्याने पालकांचा वेळ तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी खर्चाची बचत होत आहे. दाखले वेळेत मिळत असल्याने शैक्षणिक प्रवेशासाठी होणारी धावपळ कमी होत आहे.

25 मार्च ते आजमितीपर्यंत 11 तहसील कार्यालय व एक अपर तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या शिबिरांची संख्या व वाटप केलेल्या दाखल्याची संख्या खालील प्रमाणे...

1.उत्तर सोलापूर तहसील कार्यालय 25 महसूल मंडळे, 25 शिबिरांचे आयोजन तर 17,796 विविध शालेय दाखल्यांचे वाटप.

2.बार्शी तहसील कार्यालय, महसूल मंडळ 11,  शिबिरे 9, 8,202 दाखल्यांचे वाटप. 

3. दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय, मंडळाची संख्या 4, शिबिरे 4, दाखले वाटप 1,572. 

4. अप्पर तहसील मंद्रूप -महसूल मंडळे 4, शिबिरे 4, दाखले वाटप 1,746. 

5. अक्कलकोट-महसूल मंडळे 10 शिबिरे-0, दाखले वाटप 3,406, 6. माढा महसूल मंडळ 11, शिबिरे 0, दाखले वाटप 5,385 तसेच 11 ठिकाणी शिबिरे प्रस्तावित आहेत. 

7. करमाळा -महसूल मंडळे 11, शिबिरे 1, दाखले वाटप 6,016. 8.पंढरपूर - महसूल मंडळे 11, शिबिरे 12, दाखले वाटप 6,550. 9. मोहोळ - महसूल मंडळे 9, शिबिरे 9, दाखले वाटप 5,025. 10.मंगळवेढा - महसूल मंडळे 8, शिबिरे 0, दाखले वाटप 5,595. 11.सांगोला - महसूल मंडळ 10, शिबिरे 0, दाखले वाटप 7,444 आणि 12. माळशिरस -महसूल मंडळे 12, शिबिरे 12, 8,467 दाखले वाटप करण्यात आले.


To Top