निरीक्षक निता केळकर यांच्या उपस्थितीत स्वीकारला शहराध्यक्षपदाचा पदभार
सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्षपद हे पद नसून ती व्यवस्था आहे. आणि पक्षवाढीची ती जबाबदारी आहे. सर्वांना सोबत घेऊन आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोलापूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा रोवणार असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या नूतन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केले.
भाजपाच्या निरीक्षक निता केळकर यांच्या उपस्थितीत माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते रोहिणी तडवळकर यांनी गुरुवारी पक्ष कार्यालयात अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्या बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर भारती दिगडे, ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, विक्रम देशमुख, माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, प्रा. मोहिनी पत्की, सुरेश चिक्कळी, सरचिटणीस प्रा. नारायण बनसोडे, पांडुरंग दिड्डी, विशाल गायकवाड, महिला मोर्चा अध्यक्ष विजया वड्डेपल्ली, अर्चना वडनाल, संपदा जोशी, इंदिरा कुडक्याल उपस्थित होते.
याप्रसंगी भाजपा सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, नागेश सरगम, अर्जुन जाधव, महेश देवकर, नागेश खरात, बजरंग कुलकर्णी, माजी नगरसेविका संगीता जाधव, वरलक्ष्मी पुरूड, माजी नगरसेवक नगरसेवक श्रीनिवास करली, अनंत जाधव, मोहन डांगरे, चन्नवीर चिट्टे, राजा माने, हेमंत पिंगळे, निलीमा शितोळे, नीलिमा हिरेमठ, सुनिता कोरे, लक्ष्मी नडगिरी, सविता जोशी, जयश्री धप्पाधूळे, कमला शर्मा, अंबिका पाटिल आदी पदाधिकारी उपस्थित होते.