Type Here to Get Search Results !

गुरेवाहक वाहन अडवून कर्मचाऱ्यास मारहाण; नक्टा बाबुसह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

                         


                                                (प्रतिकात्मक छायाचित्र)

सोलापूर : रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या लहान-मोठ्या गायी व कालवड अशी ०६ जनावरे महानगरपालिकेच्या गुरे वाहक वाहनात गो शाळेत जमा करण्याकरीता घेऊन जात असताना आलेल्या जमावानं सरकारी कामात व्यत्यय आणला. महानगरपालिका कर्मचाऱ्याच्या कानशीलात वाजवून वाहनाची चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना जुना पुना चौकातील हॉटेल अॅम्बेसेडरसमोर बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी जवळपास पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, सोलापूर महानगरपालिका कोंडवाडा विभागातील कर्मचारी अंबादास शेखु तळभंडारे (वय ५५ वर्षे,रा. २३, शेटे नगर, लक्ष्मी पेठ, दमाणी नगर, सोलापूर) मोकाट गुरे वाहन क्रं. एम एच १३/डी क्यु ८८७३ या मध्ये लहान-मोठ्या गायी व कालवड अशी ०६ जनावरे गो शाळेत घेऊन जात असताना दुचाकीवर आलेल्या मोजम सादीक शेख आणि इतरांनी तळभंडारे आणि चालकास शिवीगाळ व दमदाटी करुन हाताने चापट मारुन, त्या वाहनास दगड मारुन वाहनाचे नुकसान करून वाहनाची चावी काढून घेण्याचा प्रयत्न करीत सरकारी कामात अडथळा केला. 

याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलिसांनी जब्बार हाजीसाब लोखंडवाले, हनीफ कुरेशी, अबरार रंगरेज, बिलाल कुरेशी, जैद कुरेशी, नक्टा बाबु आणि अन्य अनोळखी सात-आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.