स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूलमध्ये गुणवंतांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार

shivrajya patra

सोलापूर : येथील पोलीस आयुक्तालय व इंडियन मॉडेल स्कूल संचलित स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूलमधील इयत्ता १० वी पुणे बोर्ड परीक्षामध्ये ९०.०० टक्के पेक्षा जास्त गुण संपादन करीत उत्तुंग यश संपादन केलेल्या २३ विद्यार्थ्यांचा पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयातील मिटींग हॉलमध्ये शुक्रवारी, सकाळी सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्तांनी सर्व गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यंदाचं शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल कडून एकुण ९१ विद्यार्थी इयत्ता १० वी च्या बोर्ड परीक्षेला बसले होते. त्यापैकी एकुण २३ विद्यार्थी-विद्यार्थीनींनी ९०.०० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले. इयत्ता १० वी च्या पुणे बोर्ड परीक्षेत शाळेचा निकाल १०० टक्के लागला.

या कार्यक्रमास पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, पोलीस उप निरीक्षक अशोक बाबर आणि आय. एम. एस. ग्रुप ऑफ स्कूल चे डायरेक्टर अमोल जोशी व सौ. सायली जोशी, शाळा समन्वयक सौ. ममता बसवंती, स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती कारंडे, उप-मुख्याध्यापिका सौ. बिस्मिल्ला नदाफ तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.... चौकट ...

स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूलमध्ये ९७.२० टक्के गुण मिळवून साई यल्ला प्रथम स्थानी

या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १० वी च्या पुणे बोर्डात स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूलमधील कु. साई मोहन यल्ला या विद्यार्थ्यानं ९७.२० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला, कु. इरमसबा एम. हनिफ शेख ही विद्यार्थीनी ९७.०० टक्के गुण मिळवून द्वितीय तर कु. अंकिता रमेश वाघमारे ९६.८०% गुण मिळवून तृतिय स्थानी आली. 

To Top