मोहोळ : येथील बागवान चौक परिसरातील पाईप लाईन जुनी आहे. ती पाईप बदलून नव्याने टाकण्याची मागणी नागरिकांनी वेळोवेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडं वेळोवेळी केली, मात्र प्रश्न मार्गी लागलेला नाही. खासदार निधीतून ती पाईप लाईन नव्यानं टाकण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडं एका निवेदनाद्वारे करण्यात आलीय.
बागवान चौक भागातील पाईप लाईन ५० ते ६० वर्षापूर्वी जुनी असून आम्ही समस्त नागरिकांनी लेखी ती पाईप लाईन बदलून मिळावी, अशी मागणी प्रशासक अधिकारी यांच्याकडं वारंवार करण्यात आली, मात्र प्रशासक अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये कार्यात्मक समन्वय नसल्याने कोणीच कोणाचं ऐकत नाही. 
त्यामुळे बागवान चौक परिसरातील नागरिकांनी प्रशासक यांना समक्ष भेटून पाईप लाईन बदलण्याची मागणी केली, असता त्यांनी स्वतःच्या पैसे खर्च करून पाईप लाईन बदलून घ्या, अशी बेजबाबदार आणि उध्दटपणाची उत्तरे दिली जात आहेत. स्मारकांना या संबंधितांकडून मिळत आहे. नागरिकांनी नगरपरिषद नळपट्टी-घरपट्टी आजवर भरून नगरपरिषदेला वेळोवेळी सहकार्याचीच भूमिका ठेवली आहे.
नगरपरिषदेचे उद्दाम अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना या पद्धतीने वागणूक देत असतील तर नागरिकांनी उद्या नळपट्टी आणि घरपट्टी का भरावी, असा सवाल उद्या केला तर त्यासही अधिकाऱ्यांकडे समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत.
खा. प्रणिती शिंदे यांनी आपल्या खासदार निधीतून बागबान चौक परिसरातील जुनी पाईप लाईन बदलून द्यावी, अशी आग्रही मागणी खासदार शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
