सामाजिक बांधिलकीबरोबर रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात रक्तदान शिबीर

shivrajya patra

सोलापूर : रक्तदानामुळे गरजु रूग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होऊन त्याचे प्राण वाचावावे, रक्तदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, सामाजिक बांधिलकी जपावी, रक्ताचा तुटवडा भरून काढावा. तसेच रक्तदानाच्या वेळेस रक्तदात्याची आरोग्य तपासणी केली जाते. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची माहिती मिळते, या उद्देशाने रक्तदान शिबीराचे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय, सोलापूर यांच्याकरवी आयोजन केले होते.



" महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसीय सुशासन मिशन" च्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे यांनी पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण) अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर (उपविभाग सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी, 13 मे रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या प्रांगणात रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं.

या रक्तदान शिबीराकरीता सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील गावातील पोलीस पाटील यांच्याकरवी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. रक्तदान शिबीरामध्ये पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी स्वतः सहभाग नोंदवून रक्तदान केले. तसेच पोलीस ठाण्याकडील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व पोलीस अंमलदार व नागरिकांनी रक्तदान केले.

पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण) अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीणच्या कार्यक्षेत्रात " मिशन विकसित गाव" ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

प्रत्येक गावा-गावातील जमिनीची पाण्याची पातळी वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना प्रबोधन करणे, तलावातील पाण्याची पातळी वाढविण्याकरिता तलावातील गाळ काढणे या करीता तहसील कार्यालयाकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे, उत्तम शेतीचा विकास साधता येण्याकरिता कृषी विभागाच्या मदतीने शेततळे योजना राबविणे, गावातील ग्रामपंचायत शाळा मध्ये सौर उर्जेचा वापर करणे, मधुमक्षिका पालन करणे, गावामध्ये हरीत क्रांती घडवण्याठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचा उद्देश आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे हिरज गावामध्ये 5 जलतारा खड्डे घेण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग यांनी पोलीस अंमलदार यांच्यासह मौजे कुरूल येथे 1 जलतारा खड्डा घेण्यात आला. यापुढे कार्यक्षेत्रातील गावामध्ये " मिशन विकसित गाव " ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

To Top