सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज चौक येथील श्री छत्रपती संभाजी महाराज यांना शिवसेवा उपक्रमांतर्गत अभिवादन करण्यात आले. प्रारंभी जिजाऊ वंदना घेण्यात आली. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांचं चरित्र वाचन करण्यात आले. मराठा सेवा संघाचे मावळे दर रविवारी एकत्र येतात. त्यावेळी तळा परिसराची स्वच्छता, विचारांचं अदान-प्रदान केलं जातं.
यावेळी शिवश्री सदाशिव पवार, शिवश्री प्रकाश ननावरे, शिवश्री लिंबराज जाधव, शिवश्री रमेश जाधव, शिवश्री राम माने, शिवश्री राजू व्यवहारे, शिवश्री सचिन चव्हाण, शिवश्री प्रकाश डोंगरे, शिवश्री नितीन मोहिते, शिवश्री कदम, शिवश्री साळुंखे, शिवश्री सिद्धांत माने, शिवश्री शाम सुरवसे यासह अनेक मावळे उपस्थित होते.

