Type Here to Get Search Results !

बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांना पितृशोक

सोलापूर : बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांचे वडील दुन्दुरापू मल्ला रेड्डी यांचं शनिवारी, २४ मे रोजी रात्री निधन झालंय. ते मृत्यू समयी ९० वर्षीय होते. त्यांचे अंत्यसंस्कार सोमवारी सकाळी सिकंदराबाद येथील स्मशान वाटीका इथं होतील, असं सांगण्यात आलंय.

चिरंजीव दुर्गा रेड्डी यांच्या भवना एन्क्लेव्ह, बोईनपल्ली, सिकंदराबाद येथील निवासस्थानावरून  त्यांची अंत्ययात्रा उदईक सोमवारी, २६ मे रोजी सकाळी ११:०० वाजता निघणार आहे.  सिकंदराबाद येथील तिरुमलगिरी स्मशान वाटीका येथे त्यांचा अंत्यविधी होणार असल्याचं सांगण्यात आलंय.

त्यांच्या प्रश्चात पत्नी दुन्दुरापू गालम्मा, तीन मुले दुर्गा रेड्डी, राम रेड्डी,नरेंद्र रेड्डी‌, स्नुषा  विमला रेड्डी, वंदना रेड्डी, मधुमती रेड्डी, मुलगी भाग्यम्मा व जावई नरसिंह रेड्डी तसेच नातू-पणतू असा परिवार आहे.