श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध प्रकारच्या दाखल्याचे शिबीर आयोजन

shivrajya patra

सोलापूर : सोलापूर शहरातील आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना या जाहीर प्रसिध्दीकरणान्वये कळविण्यात येते की, इयत्ता दहावी अणि बारावीचा निकाल लागल्याने पूढील शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, राहिवासी दाखला, आर्थिक दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र EWS, नॉन क्रिमीलेअर तसेच इतर शैक्षणीक दाखल्याची आवश्यकता असते. हे दाखले विद्यार्थ्यांना विहीत वेळेत देणे आवश्यक आहे. 

ही प्रकिया पूर्ण करण्यासाठी विविध भागात शिबीराचे आयोजन करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेशित केलं आहे.

त्या अनुषंगाने, सोलापूर शहरातील तसेच उत्तर सोलापूर ग्रामीण भागामध्ये दिनांक 20 ते 22 मे 2025 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत दाखल्याविषयक शिबीराचे एकूण 20 ठिकाणी आयोजन केले आहे. 

या शिबीरप्रसंगी 03 नायब तहसिलदार, 10 मंडळ अधिकारी, 2 अव्वल कारकून, 40 तलाठी, 03 कार्यालयीन कर्मचारी व 85 महा-ई-सेवा चालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिबीराचे स्थळ, दिनांक व वेळ खालीलप्रमाणे आहे.

शिबिराचे स्थळ :- 

संगमेश्वर कॉलेज सात रस्ता सोलापूर, 

वालचंद कॉलेज, एकता नगर सोलापूर, 

दयानंद कॉलेज, सोलापूर, 

एस. के. बिराजदार हायस्कूल, शेळगी,  

सोनी कॉलेज, सोलापूर, 

इंडियन मॉडेल स्कूल (IMS) जुळे सोलापूर, 

ज.रा. चंडक हायस्कूल, बाळे, 

बी.एम.आय.टी कॉलेज, हिरज रोड सोलापूर, 

बी.एफ. दमाणी. स्कूल सम्राट चौक, सोलापूर, 

हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर, 

नेताजी प्रशाला, निलम नगर, सोलापूर,

एस.व्ही.सी.एस प्रशाला, भवानी पेठ, सोलापूर, 

एस.व्ही.सी.एस प्रशाला, अक्कलकोट रोड, सोलापूर, 

सेवासदन प्रशाला, सोलापूर, 

भारतीय विद्यापीठ, सोलापूर, 

सोलापूर सोशल उर्दू हायस्कूल, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर, 

सिद्धेश्वर हायस्कूल सिद्धेश्वर पेठ, सोलापूर, 

पानगल हायस्कूल व कॉलेज, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर, 

न्यू हायस्कूल वडाळा, ता. उत्तर सोलापूर, 

महात्मा फुले, हायस्कूल मार्डी, ता. उत्तर सोलापूर.

दिनांक व वेळ :- 

दिनांक 20 ते 22 मे 2025, 

सकाळी 10:30 वा. ते सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत.

तरी सर्व नारिकांनी शिबीर प्रसंगी उपस्थित राहून शैक्षणीक दाखले प्राप्त करून घेण्याची दक्षता घ्यावी, अशी माहिती उत्तर सोलापूर तहसिलदार निलेश पाटील यांनी दिलीय.

To Top