धामोरी येथील विद्युत पुरवठ्याचा खेळखंडोबा; व्यावसायीक-ग्रामस्थ त्रस्त

shivrajya patra

धामोरी/दत्तात्रय घुले : कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील एम.एस. ई. बी. अंतर्गत विद्युत पुरवठा सातत्याने तासन् तास खंडीत होत असल्याने येथील व्यावसायीक व ग्रामस्थ उकाड्याने हैराण व त्रस्त होताना दिसून येत आहे.

धामोरी या मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी परिसरातील मायगाव देवी, सांगवी भुसार, शिरवाडे वाकद, चास- मोर्वीस या गावांचा युनियन बॅंक ऑनलाईन कामे शेतकरी औजारे ईलेक्टिक कामे प्रलंबित राहुन जातात. 

तसेच विद्युत पुरवठा  कर्मचारी लाईनमन यांचं संख्या बळ ही कमी असल्याने व स्थानिक रहिवासी नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने येथील व्यावसायिक व ग्रामस्थ हैराण व त्रस्त होताना दिसत आहे.

तरी संबंधित विद्युत पुरवठा महावितरण अधिकाऱ्यांनी धामोरी येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी व चर्चेचा विषय येथील व्यावसायिक व ग्रामस्थांमधून होत आहे.

To Top