Type Here to Get Search Results !

' ए धरती है, बलिदान की ' सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्ती आणि त्यागाच्या जागराबरोबर शहिदांना श्रध्दांजली !


सोलापूर : 'कर चले हम फ़िदा, जानोतन साथीयो', 'हर करम अपना करेंगे, ऐ वतन तेरे लिए', अशी देशभक्तीनं ओतप्रोत भरलेली आणि देशासाठी सर्वस्व त्यागाची जाणिव करून देणारी अजरामर गीतं वाजत राहिली. त्यातच भर होती, 'देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया', 'खेळ मांडला देवा', ईश्वरी आस्तित्वाची प्रत्येक जीवाला क्षणाक्षणाला स्मरण करून देणारी गीत ... स्वर होता महाराष्ट्राचे महागायक मोहम्मद अयाज यांचा ... या कार्यक्रमात देशभक्ती आणि देशासाठी त्यागाच्या जागराबरोबर शहिदांना श्रध्दांजली अर्पित करण्यात आली.

निमित्त होतं ... सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या कौतुकाचं ... महाराष्ट्र शासनाचे १०० दिवस कृती आराखडा विशेष मोहीम-२०२५ या विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत सोलापूर ग्रामीण पोली दलानं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गशनाखाली उत्कृष्ट कामगिरी करीत महाराष्ट्र राज्यात चौथा क्रमांक पटकावला. 

सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात या निमित्ताने गौरव समारंभ सोहळ्याचं आयोजित करण्यात आला होतं. या गौरव समारंभात सोलापूर चे गायक मोहम्मद अयाज यांचा ' ए धरती है, बलिदान की ' सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केले होते.

या सांस्कृतिक कार्यक्रमात गाणी मोहम्मद अयाज व त्यांच्या सहकलाकारांनी देशभक्ती गीताबरोबरच हिंदी-मराठी अजरामर गाण्यांचं सादरीकरण करीत उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली. या कार्यक्रमात पहेलगाम मधील निष्पाप शहिदांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. 

पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उप अधीक्षक श्रीमती विजया कुर्री यांनी पोलीस परिवारास संबोधित करताना, आपण राज्यात चौथा क्रमांक पटकावला, येत्या काळात आपल्या कर्तव्य-सेवेच्या माध्यमातून प्रथम स्थान प्राप्त करु, असा विश्वास व्यक्त केला. यंदा मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी सर्वांचं आभार व्यक्त केले. 


पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी ' ए धरती है, बलिदान की ' या कार्यक्रमातील गायक मोहम्मद अयाज आणि त्यांच्या सहकलाकारांचा अभिनंदन केले. यावेळी व्यासपीठावर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उप पोलीस अधिक्षक विजया कुर्री यांच्यासह डी.वाय.एस.पी. जिल्ह्याभरातून आलेले ग्रामीणचे पोलीस अधिकारी, पोलीस परिवार आपल्या परिवारासह उपस्थित होते.

छायाचित्र : पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उप अधीक्षक विजया कुर्री आणि गायक मोहम्मद अयाज छायाचित्रात दिसत आहेत.