सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाच्या उत्सव अध्यक्ष म्हणून सिद्धबाबा निशाणदार तर कार्याध्यक्षपदी उमेश कोळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृहात शनिवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने या बैठकीस सुरुवात झाली. यावेळी माजी नगरसेवक सुरेश पाटील, शैलेश पिसे, गणेश नरोटे, बाळासाहेब वाघमोडे, माजी अध्यक्ष पद्माकर हळ्ळी, गुरू कावडे, मनिषा माने, सुजित खुर्द यांची प्रमुख उपस्थिती होती.
यंदाचं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती उत्सवाचं वर्ष असून यानिमित्त वर्षभर लोकोपयोगी व समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यासंदर्भात या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली.
सन 2024-25 च्या पदाधिकाऱ्यांनी जयंती उत्सवाचा लेखाजोखा सादर केला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती महामंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्धार करण्यात आला. सन 2025-26 साठी उत्सव अध्यक्ष म्हणून सिद्ध बाबा निशाणदार तर कार्याध्यक्षपदी उमेश कोळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. खजिनदारपदी शेखर बंगाळे तर सचिवपदी महेश गाडेकर, उपाध्यक्ष दिगंबर खरात, गंगाधर गावडे, शशीकला कसपट्टे, आदींची निवड करण्यात आली.
यावेळी बिपिन पाटील, पृथ्वीराज नरोटे, संस्कार नरोटे, किशोर खरात, सोपान खांडेकर यांच्यासह अहिल्या भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.