सोलापूर : "मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या" वतीने, "आरोग्य मित्र" या वार्ता फलकाचे उद्घाटन श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रांगणात संघर्ष कामगार संघटना समितीचे अध्यक्ष अंगद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालयात, रुग्णांची सेवा, रुग्णांच्या अडचणी व रुग्णांच्या इतर समस्या सोडविण्यासाठी त्याचबरोबर, अनेक राष्ट्रीय सुट्ट्या, ग्रामीण भागातील रुग्णांना माहीत नसल्याने हेलपाटा होऊ नये, याच्या सूचना लिहिण्यासाठी आणि रुग्णांच्या समस्या, तसेच रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांपासून निर्माण होणाऱ्या समस्या या वार्ता फलकावर नमूद करण्यात येणार आहेत, असे विधायक व रुग्णसेवेसाठी, या वार्ता फलकाचे उद्घाटन करण्यात आले आहे, असे आरोग्य सेवक सुमित भांडेकर यांनी सांगितले. समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी विठ्ठल कुराडकर, रेखा आडकी, गुरुनाथ कोळी, लक्ष्मीबाई इप्पा, राधिका मिठ्ठा, सविता दासरी, पद्मा मॅकल, लक्ष्मी गुंटला, राणी दासरी, प्रीती आडकी, रमेश चंदनशिवे यांची उपस्थिती होती.
छायाचित्र : मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने' "आरोग्य मित्र" या वार्ता फलकाचे उद्घाटन करताना अंगद जाधव, विष्णू कारमपुरी यांच्यासह समितीचे पदाधिकारी छायाचित्रात दिसत आहेत.