Type Here to Get Search Results !

नराधम पित्यानेच केली पोटच्या मुलीची अमानुष हत्या

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे कुसूर येथे पित्याच्या अनैतिक संबंधाचा उलगडा चिमुकलीकडून होऊ नये म्हणून, एका बापानेच आपल्या अवघ्या 08 वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला. या हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह पुरून टाकल्याची अत्यंत हृदयद्रावक व संतापजनक घटना पोलीस तपासात उघडकीस आलीय.

मंद्रुप पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ प्रमाणे अकस्मात मयत दाखल होते. या मयताचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी अधिक कौशल्यपुर्ण तपास करून घटनेच्या मुळाशी जावून निष्पाप आठ वर्षाच्या मुलीच्या बापाने आपले अनैतिक संबंध उघड होऊन समाजात बदनामी होईल, या भयापोटी गुरुवारी, २२ मे रोजी रात्री मुलगी श्रावणी आपल्या आजोबाच्या घरी जेवण करून आपल्या जन्मदात्या पित्याजवळ झोपण्यासाठी गेली. त्यावेळी ओगसिध्द कोठे या नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीला फिट आल्याचे भासवून तिचा मृत्यू झाला आहे, असं भासवून तिचा गळा दाबून जिवे ठार मारून तिचा मृतदेह घरासमोर बांधकामासाठी खणलेल्या खड्ड्यात पुरून पुरावा नाश केला.

याबाबत मंद्रुप पोलीस ठाणेस भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात ओगसिध्द रेवणसिध्द कोठे (वय-३५ वर्षे) नराधम पित्यास ताब्यात घेण्यात आले असून अटक करून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक राज डांगे हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर,  उपविभागीय पोलीस अधिकारी (सोलापूर उपविभाग) संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (अक्कलकोट उपविभाग) विलास यामावार (अति. कार्यभार-सोलापूर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राज डांगे हे करीत आहेत.