Type Here to Get Search Results !

'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी' युवकांनी केला योगाभ्यास; पार्श्वभूमी ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची !

११ वा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय मैदान येथे आयोजित दोन दिवसीय योग शिबीराचे मोठ्या उत्साहात समारोप

लहान बालकापासून ते वरिष्ठ नागरीकांनी घेतला योगाचा लाभ   रिमझिम पावसात वरिष्ठ नागरिकांनी  केला झुम्बा डान्स...

सोलापूर : २१ जून रोजी होणाऱ्या ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रिय संचार ब्यूरो, सोलापूर आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांचे सयुंक्त विद्यमाने शासकीय मैदान, नेहरू नगर, सोलापूर येथे दिनांक २३ व २४ मे रोजी सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत योग अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  याचा आज समारोप झाला असून दोन दिवसांत हजारोच्या संख्येत लहान मुले, महिला, युवा-युवती आणि वरिष्ठ नागरिकांनी योगाभ्यासाचा लाभ घेतला, अशी माहिती सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांनी दिली.

लहान मुले-मुली, युवा-युवती, खेळाडू आणि वरिष्ठ नागरिक यांच्यामध्ये योग दिन आणि योग अभ्यासाचा सराव व्हावा या उद्देशाने शासकीय मैदान येथे भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार संतोष अरवत्तू, उद्योजक विरेश नसले, हेमंत जाधव, सतीश घोडके, ज्येष्ठ पत्रकार अजित सांगावे, संतोष कदम, प्रकाश जाधव, रफीक शेख आणि विजयसिंह बायस आदि उपस्थित होते.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने निश्चित केलेल्या ४५ मिनिटाचे कॉमन योग प्रोटोकॉल अनुसार प्रार्थना, शिथिलीकरण, दंड स्थितीतील ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, बैठक स्थितीतील दंडासन, भद्रासन/बध्दकोनासन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन उष्ट्रासन, शशांकसन, उत्तान मंडूकासन, वक्रासन, पोटावर झोपून करावयाची आसने मकरासन, भुजंगासन, शलभासन, पाठीवर झोपून करावयाची आसने सेतुबंध सर्वांगासन, उत्तान पादासन, अर्धहलासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभाती, प्राणायाम, ध्यान, संकल्प आणि शांति पाठ आदी आसनांचा सराव योग सेवा मंडळाचे संस्थापक तथा योगगुरू मनमोहन भुतडा आणि विवेकानंद केंद्राचे नगर प्रमुख रवी कंटली आणि त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लहान बालकापासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वानी आसनांचा सराव केला. केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने शिबिरातील सहभागी साधकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

योग सरावानंतर धीरज हिवले, आकाश आणि श्रावण यांच्या टीमने उपस्थित नागरिकांकडून झुंबा डान्स करून घेतला. उपस्थित साधकांनी झुंबा डान्सचा मनमुराद आनंद लुटला.

नागरिकांना मोबाईलवर पाहून घरच्या घरी योग आसनांचा सराव करता यावे, या उद्देशाने शिबिराच्या विविध ठिकाणी कॉमन योगा प्रोटोकॉलची माहिती देणारे क्यू आर कोड लावण्यात आले होते. 

या योग शिबिरामध्ये योग सेवा मंडळ, विवेकानंद केंद्र, न्यू जॉगर्स फौंडेशन, नीर सोशल फौंडेशन, समर्थ करिअर अकॅडमी, प्रार्थना  अकॅडमी , सिद्धेश्वर अकॅडमी, विराट स्पोर्टस अकॅडमीचे शिक्षक, खेळाडू, महिला आणि वरिष्ठ नागरिकांनी नियमित योगाचा सराव करणार असल्याचा संकल्प यावेळी केला.

शिबिराच्या यशस्वितेसाठी केंद्रीय संचार ब्यूरोचे कार्यालय सहायक जे. एम. हन्नुरे, साईराज राउळ, मनोज जखेटिया, काशिनाथ औरसंग, गुरुलिंग प्रचंडे, पंकज वाघमोडे, योगीराज कोंडाबत्तीन, किरण गवळी, महेश चव्हाण, लक्ष्मीकांत माळी, पियुष राकेश कुरापटी आणि नागनाथ कोळी आदींनी परिश्रम घेतले.