सोलापूर : हैद्राबाद रस्त्यावरील बोरामणी शिवारातील किर्ती गोल्ड ऑईल कंपनीजवळ शुक्रवारी एक ज्येष्ठ महिला आढळून आली होती. त्या महिलेस स्वतःची ओळख सांगता आली नाही. त्या महिलेची ओळख पटवून देण्यात सहकार्य व्हावं, या भावनेने रूग्णसेवक मोहम्मद पठाण सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केलं होतं. दरम्यान त्या महिलेस बोरामणी येथील शासकीय आरोग्य रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं.
'आपला एक हात मदतीचा' या उपक्रमाच्या माध्यमातून त्या महिलेच्या नातेवाईकांचा शोध व्हावा, ती तिच्या आप्तेष्ठांपर्यंत घरी पोहोचावी, असा प्रयत्न प्रहार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष रुग्णसेवक महंमद पठाण (संपर्क : 9325164242) यांचा होता. त्या प्रयत्नास यश आलंय.
आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे त्या महिलेस त्यांच्या मुलगा आणि स्नुषेच्या ताब्यात देण्यात आले आहे. ज्या महिलेस स्वतःची ओळख सांगता येत नव्हती, त्या महिलेचे नाव पार्वती यमगवळी असं असल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगताना, मोहम्मद पठाण यांचं आभारही व्यक्त केलंय. मला हे यश मिळाले हे यश आपले सुध्दा आहे, असं रुग्णसेवक मोहम्मद पठाण यांनी म्हटलं आहे.
ज्यांनी स्टेटस ठेवत काॅल केले, त्यांचंही याकामी शब्दात वर्णन करता येत नाही, इतकं सहकार्य लाभलं असून पार्वती यमगवळी यांना सध्या सोलापूर सिव्हिल हाँस्पिटल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
'आपला एक हात मदतीचा' या उपक्रमाला हातभार म्हणून प्रहार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष रुग्णसेवक महंमद पठाण (संपर्क : 9325164242) आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये कंसातील भ्रमणध्वनी क्रमाक ॲड करावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.