Type Here to Get Search Results !

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम २०१३ अन्वये समिती स्थापन करण्याचे आवाहन

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाने Writ pition civil १२२४/२०१७ मध्ये सदर अधिनियमाच्या अमलबजावणी बाबत राज्य शासनाला निर्देश दिलेले आहेत कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी Posh Act मधील कलम ४ अन्वये ज्या आस्थापना मध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त कर्मचारी असतील आशा सर्व खाजगी अस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.

त्याकरीता सर्व खाजगी अस्थापनाना आवाहन करण्यात येते की, १० किंवा १० पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा खाजगी आस्थापनांनी महिला व बाल विकासाच्या SHE BOX PORTAL(HTTPS://SHEBOX. WCD.GOV.IN/) वर जाऊन अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापनेबाबत नोंद करावी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ अन्वये समिती स्थापन न केल्यास ५० हजार रुपये पर्यंत दंड केला जाईल, याची नोंद घ्यावी. तसेच सदर समिती गठीत करण्याबाबत अथवा कायद्याबाबत अधिकची माहिती पाहिजे असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, शोभानगर, बिग बाजाराच्या पाठीमागे, सातरस्ता सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर यांनी केले आहे.