7/12 सदरी पोटखराब क्षेत्र कमी करुन लागवडीलायक क्षेत्रात वाढ करण्याच्या होत्या सविस्तर सूचना
सोलापूर : राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी 100 दिवसांचा कृति आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर क्षेत्रीय कार्यालयांकरीता देखील 100 दिवसांमध्ये नागरिकांच्या काही महत्वाच्या विषयांवर मोहिम घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश देणे आवश्यक होते. त्यामध्येच पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणले असल्यास त्याप्रमाणे 7/12 सदरी पोटखराब क्षेत्र कमी करुन लागवडीलायक क्षेत्रात वाढ करण्याच्या सविस्तर सूचना दिनांक 13 मार्च 2025 रोजी परिपत्रक काढून देणेत आले आहेत.
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिेलेख, पुणे यांचे दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजीच्या परिपत्रकानुसार महसुली गावातील जमीनधारकाने पोटखराब वर्ग (अ) ची जमीन लागवडीखाली आणल्यास अतिरिक्त आकारणी करावयाच्या कार्यपध्दती बाबत निर्देश दिले आहेत. या परिपत्रकानुसार जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली आणणे हा उद्देश आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडील परिपत्रक दिनांक 13 मार्च 2025 अन्वये पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणणेकामी महसूली अधिकारी व प्राधिकारी यांना कार्यपध्दतीबाबत कालबध्द कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे.
पोटखराब वर्ग (अ) मधील क्षेत्र लागवडीखाली आणल्यास अतिरिक्त आकारणी करणेचे अधिकार तहसिलदार यांना प्रदान करणेत आले असून तहसिलदार यांचे स्तरावर तालुकास्तरीय समिती स्थापन करुन विशेष मोहिम राबविणेबाबत निर्देश दिले होते.
त्यानुसार संबंधित तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे विशेष मोहिम राबवून लागवडीखालील पोटखराब गटाची संख्या 5082 (क्षेत्र 2480.48 हे.आर) शोध घेऊन त्यापैकी 2888 गट (क्षेत्र 1340.77 हे. आर) लागवडीखली आणलेबाबत आदेश पारित केलेले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये सदर विषयाबाबत अत्यंत चांगले काम झालेले आहे.
ही मोहिम प्रभावीरित्या राबविण्यात आल्यामुळे पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आल्यामुळे लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणत वाढ होऊन महसूली उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच जमिनीमध्ये सुधारणा केल्यामुळे त्याच्या जमिनीच्या मूल्यात देखील वाढ होण्यास मदत होईल.
अंतिम विकास आराखडा DP मंजूर असलेल्या भागामध्ये 42 प्रमाणे प्रादेशिक व प्रारुप विकास आराखडा मंजूर असलेलया 42क प्रमाणे व कोणत्याही गावठाणाच्या हद्दीपासून 200मी च्या आतील क्षेत्राकरीता 42ड प्रमाणे अकृषिक वापराची सनद देणेत येते.
या सनद प्रदान केल्यामुळे संबंधित जमीनधारकांना वेगळयाने अकृषिक परवानगी घेण्याची गरज गहत नाही. शासनाच्या 100 दिवस कृति आराखडा कार्यक्रमा पूर्वी सन 2017 ते सन 2024 पर्यंत 42ब, 42क व 42ड मध्ये एकूण 12 हजार 241 सनद प्रदान करणेत आलेल्या होत्या. शासनाच्या 100 दिवस कृति आराखडा कार्यक्रमामध्ये विशेष मोहिम घेऊन सोलापूर जिल्हयात तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांनी एकूण 40 शिबीर घेण्यात आले.
सोलापूर जिल्हयात 42ब, 42क व 42ड च्या 100 दिवसाच्या विशेष मोहिमेमध्ये एकूण 3 हजार 247 सनद वाटप करण्यात आले आहे. सनद प्रदान केलेमुळे जमीन महसूलात वाढ होऊन संबंधित मिळकतधारकांना त्यांचे मिळकतीमध्ये अकृषिक वापर सुरु करणेस सुलभ झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.