बँक कर्मचारी-सोसायटी सचिवांना सर्वतोपरी सहकार्य करू : सभापती दिलीपराव माने

shivrajya patra

दिलीपराव माने यांची सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

कासेगांव/संजय पवार : बाजार समितीच्या माध्यमातून बँक कर्मचारी-सोसायटी सचिवांच्या हितासाठी जे सहकार्य करता येईल, ते करणार असल्याचं आश्वासन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती माने यांनी दिले.

नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सभापतीपदी माजी आमदार दिलीपराव माने यांची निवड झाली. या निवडीप्रित्यर्थ दक्षिण सोलापूर बँक कर्मचारी व सोसायटी सचिव यांच्या वतीने सोलापूर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना सभापती दिलीपराव माने बोलत होते.

यावेळी शाखा निरीक्षक वाघमारे, कासेगाव शाखा निरीक्षक गवळी, सोलापूर जिल्हा विशेष वसुली अधिकारी शिवानंद नडगेरे, किरण घंटे कासेगाव सचिव नागेश आवताडे, बोरामणी सचिव रमेश मोहिते, मुस्ती सचिव माशाळे आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कासेगांव सोसायटीचे सचिव नागेश आवताडे यांनी तर रमेश मोहिते यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. यावेळी विविध गावचे सोसायटी सचिव आणि बँक कर्मचारी उपस्थित होते.

To Top