राज्य शासनाने घेतली सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांच्या निवेदनाची दखल; घरकुलाच्या कामाला येणार गती

shivrajya patra

सोलापूर : सोलापुरातील अनेक विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे आणि पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्ते सातत्यानं आवाज उठवत असतात. सोलापूरमधील रखडलेले काम मार्गी लागेपर्यंत वैभव गंगणे हे सातत्याने पाठपुरावा करीत असतात. राज्य सरकारकडून वैभव गंगणे यांना आले स्पीड पोस्ट पत्र आलं असून ज्यामुळे बेघर लाभार्थ्यांच्या रखडलेल्या घरकुलाच्या कामाला गती येणार आहे. 

सोलापूर शहर-जिल्ह्यामधील बेघरांना तात्काळ निवासाची व्यवस्था करून देण्यात यावी. या मागणीचे निवेदन वैभव गंगणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अदिती तटकरे यांना लेखी निवेदनाद्वारे दिले होते.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुरू असलेले घरकुलांचे काम तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित होते. त्यामुळे सोलापुरातील अनेक बेघरांना त्याचा लाभ घेता येत नव्हता. या समस्या तातडीने सोडवून पूर्ववत घरकुलांच्या प्रकल्पास सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी वैभव गंगणे यांनी निवेदनात केली होती. 

याची खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत तांत्रिक अडचणीची माहिती जाणून घेऊन पूर्ववत प्रकल्पाच्या कामास सुरू करण्याचे आदेश दिले.

वैभव गंगणे यांच्या लेखी निवेदनाची अजित पवार व आदिती तटकरे यांनी दखल घेऊन न्याय दिला. आता सोलापुरातील बेघर लोकांच्या हक्काचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार असल्याने सोलापूरकरांच्यावतीने वैभव गंगणे यांनी उभयतांचे आभार व्यक्त केले.

यापुढे देखील शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूरकरांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी प्रामाणिकपणे कार्यशील राहू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

To Top