दिवसा घरफोडी-चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीस ०७ वर्षांचा कारावास आणि द्रव्य दंड

shivrajya patra

सोलापूर : जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिवसा घरफोडी-चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केलं होतं. न्यायालयात सुनावणी झाल्यावर सरकार पक्षाने सादर केलेले पुराव्याच्या आधारे सश्रम कारावास आणि द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली. आरोप सिध्दामध्ये सोनाराचाही समावेश असून बार्शी न्यायालयाने त्यास 07 वर्षे कारावास व 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

बार्शी शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.सं.क. 454, 380, 201, 413, 34, 75 प्रमाणे दाखल गुन्ह्यात दिवसा घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा उकल करुन मध्यप्रदेश येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकानं रेकॉर्डवरील सराईत आरोपीतांना अटक करुन त्यांचेकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला  होता.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण चे तत्कालिन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील सफौ/ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, प्रकाश कारटकर, अक्षय डोंगरे, अक्षय दळवी, अनिस शेख व चालक समीर शेख यांनी करुन गुन्ह्यातील मुद्देमाल व तांत्रिक पुरावा सी.सी.टी.व्ही फुटेज इत्यादी हस्तगत करुन आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

या गुन्ह्यातील आरोपींना, 19 एप्रिल 2023 रोजी अटक करण्यात आली होती. तेंव्हापासून सर्व आरोपी हे अद्यापर्यंत न्यायालयीन कोठडीतच (जेलमध्ये) होते.

त्या आरोपींविरुध्द स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांनी सबळ पुरावा गोळा करुन न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते. त्यावेळी वरील आरोपींकडून एकूण 07 घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली होती.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील सफौ/ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, प्रकाश कारटकर, अक्षय डोंगरे, अक्षय दळवी, अनिस शेख व चालक समीर शेख (सर्व नेमणूक : स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण, अमोल माने बार्शी शहर पोलीस ठाणे व सरकारी अभियोक्ता दिनेश देशमुख, कोर्ट पैरवी पो.स.ई. संजय कपडेकर व पो.कॉ.गणेश ताकभाते यांनी बजावली.

* ... हे आहेत आरोपसिध्द गुन्हेगार  *

1) पवन उर्फ भुरा रामदास आर्य (वय-38 वर्षे) - 07 वर्षे कारावास व 2000 रु. दंड

2) मनोजकुमार ठाकूरदास आर्य (वय-32 वर्षे) - 05 वर्षे कारावास व 2000 रु. दंड

3) देवेंद्र उर्फ राज रामलाल गुर्जर (वय-37 वर्षे) - 05 वर्षे कारावास व 2000 रु. दंड

4) दिपेंद्रसिंग उर्फ चिंटू विजयसिंग राठोर (वय- 41वर्षे, व्यवसाय-सोनार) 07 वर्षे कारावास व 5000 रु. दंड  (सर्व रा. इंदौर, मध्यप्रदेश.)

चोरीचे सोने घेऊन त्याचा रवा बनवून विक्री करण्याच्या गुन्ह्याचा आरोप सिध्द गुन्हेगार दिपेंद्रसिंग राठोर व्यवसायाने सोनार होता. त्यास 07 वर्षे कारावास व 5000 रु. दंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

To Top