श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथे वारांगणा व तृतीयपंथी यांचे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न
सोलापूर : शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या १०० दिवस कृती आराखडा अंतर्गत अशा प्रकारच्या उपेक्षित व दुर्लक्षित समाज घटकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर राबवणारे डॉ. वै. स्मृ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर हे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय ठरलं आहे.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने समाजातील उपेक्षित व दुर्लक्षित समाज घटक असलेल्या वारांगणा व तृतीयपंथी यांच्यासाठी येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात सोमवारी,07 एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. विद्या तिरणकर, डॉ. अग्रजा चिटणीस, डॉ. औदुंबर मस्के, डॉ. पायल सैयम, डॉ. वैभव गोटे, डॉ. वैष्णवी, डॉ. श्रमा कोरेमोरे, डॉ. रायखेलकर, डॉ. शशिकला जगताप, जवंजाळ, राजू माने, स्वरूप इंदापुरे, अॅड. देवयानी किणगी, श्रीमती रेणुका जाधव तसेच All Dapcu Team ART Staff यांनी परिश्रम घेतले.