सोलापूर : येथील सोलापूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनचा प्रकल्प प्रमुख म्हणून जगदीशचंद्र शास्त्री भामधिपती यांनी , 28 मार्च रोजी कार्यभार स्वीकारला. एनटीपीसी सोलापूर च्या कार्यकारी संचालक या पदावर कार्यरत असलेल्या शास्त्री यांना तीन दशकांहून अधिक उद्योगाचा अनुभव असून, तांत्रिक कौशल्य आणि नेतृत्वगुणांमध्ये त्यांचे मोठे योगदान अशी त्यांची औद्योगिक पटलावर ओळख आहे.
शास्त्री यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT), कुरुक्षेत्र येथून विद्युत अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली आहे (1989). त्यांनी सप्टेंबर 1989 मध्ये NTPC मध्ये आपली व्यावसायिक यात्रा सुरू केली. ते ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोचे प्रमाणित ऊर्जा लेखापरीक्षक आहेत. त्यांनी मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर डिप्लोमा देखील संपादन केला आहे.
रामागुंडम, एसआर-एचक्यू, सिंगरौली, फरक्का आणि बीआरबीसीएलसह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये विविध विभागांत केलेले काम आणि कामाचा दांडगा अनुभव या शास्त्री यांच्या जमेच्या बाजू आहेत.
एनटीपीसी सोलापूरचे कार्यकारी संचालक म्हणून जगदीश चंद्र शास्त्री भामधिपती व्यापक कौशल्य घेऊन आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली एनटीपीसीने उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यांचा अनुभव आणि दृष्टीकोन एनटीपीसी सोलापूरच्या विकासासाठी मोलाचा ठरणार आहे.
