Type Here to Get Search Results !

क्रांतिकारी शेतकरी संघटना राज्य समन्वयकपदी सचिन पांडुळे

पुणे : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्य समन्वयकपदी आक्रमक युवा नेतृत्व सचिन पांडुळे यांची एकमताने निवड करण्यात आली. पुणे येथे संघटनेची महत्वाची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीस संस्थापक रविकांत तुपकर,क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे, युवक प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे, युवती प्रदेशाध्यक्षा अश्विनी मेहेत्रे, गजानन कावरखे, किरण ठाकरे, कुलदीप करपे, डॉ. ज्ञानेश्वर टाले, ॲड. कुशल चव्हाण उपस्थित होते. यावेळी नियुक्ती जाहीर करण्यात आली. सचिन पांडुळे त्यांनी या निवडीबद्दल संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले.

...Visit Us : www.shivrajyapatra.co.in 

गेल्या जवळपास ९ वर्षांपासून सचिन पांडुळे चळवळीत सक्रिय आहेत. विविध विद्यार्थी आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळून दिलेला आहे. युवक, महिला, शेतकरी याचबरोबर अनेक सामाजिक मुद्द्यांवरील आंदोलनांमध्येही त्यांनी रस्त्यावर उतरून काम केलं  आहे. आक्रमक आंदोलनामुळे त्यांना आतापर्यंत ३४  हून अधिक वेळा आंदोलनात अटक झालीय.

सचिन पांडुळे म्हणाले,'माझी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्य समन्वयक पदी निवड केल्याबद्दल संघटनेतील वरिष्ठ नेतृत्वाचे मनापासून आभार ! 

संघटनेने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी हा अर्थव्यवस्थेतील अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात मोठा घटक असूनदेखील नेहमीच दुर्लक्षित ठेवला गेला आहे. म्हणूनच त्यांच्या न्याय व हक्कासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा संघटनात्मक विस्तार करणे व राज्यभरात संघटनेचा लौकिक वाढवणे, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असेन, असंही त्यांनी निवडीनंतर सांगितलंय.