सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सन 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी एकुण - 83 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवारी, 22 एप्रिल रोजी दुपारी 12.00 वा. श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृह, सोलापूर येथे सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे.
या आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील इच्छुक सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असं आवाहन तहसिलदार दक्षिण सोलापूर किरण जमदाडे यांनी केलं आहे.