वीरशैव व्हिजनच्या व्याख्यानमालेचे यंदाचं 11 वे वर्ष
सोलापूर : जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव व्हिजनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही 25 ते 27 एप्रिल दरम्यान रोज सायंकाळी ६ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलं आहे. बसव व्याख्यानमालेचे पहिलं पुष्प डॉ. गिरीश जाखोटीया गुंफणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
यंदाचे व्याख्यानमालेचे 11 वे वर्ष असून या तीन दिवसीय बसव व्याख्यानमालेतील पहिले पुष्प शुक्रवारी, 25 एप्रिल रोजी डॉ. गिरीश जाखोटीया (मुंबई) हे 'महात्मा बसवेश्वर व 21 वे शतक' या विषयावर गुंफणार आहेत. या पहिल्या पुष्पाचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, सोलापूर नागरी बँक असोसिएशनचे चेअरमन प्रकाश वाले, महावीर बँकेचे चेअरमन दीपक मुनोत, कांचन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदीप चाकोते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दुसरे पुष्प शनिवारी, 26 एप्रिल रोजी इंद्रनील बंकापुरे (कोल्हापूर) हे 'मंदिराच्या देशा' या विषयावर गुंफणार आहेत. दुसऱ्या पुष्पाचे उद्घाटन आ. प्रवीण स्वामी (उमरगा) यांच्या हस्ते व मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी उद्योगपती दत्ता अण्णा सुरवसे, सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, उद्योजक पंडित जळकोटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
रविवारी, 27 रोजी नारायण पुरी यांच्या 'हास्यधारा' या विनोदी कार्यक्रमाने या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. समारोपाच्या पुष्पाचे उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते आणि माजी विरोधी पक्षनेता अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त दीपक आर्वे, सागर सिमेंटचे व्यवस्थापक महादेव कोगनुरे, श्री सिद्धेश्वर बँकेचे संचालक सिद्धेश्वर मुनाळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, या व्याख्यानमालेस उपस्थित राहणाऱ्या श्रोत्यांमधून दररोज ५ श्रोत्यांना सोडतीद्वारे आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तरी सोलापूरवासियांनी या बसव व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांनी केलं आहे.
या पत्रकार परिषदेस नागेश बडदाळ, आनंद दुलंगे, विजयकुमार बिराजदार, सोमेश्वर याबाजी, राजेश नीला, अविनाश हत्तरकी, सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते.