रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीतर्फे गुळवंची येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

shivrajya patra


सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, डॉ. वि. म. मेडिकल कॉलेज, सोलापूर कॅन्सर सोसायटी आणि गुळवंची ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी, ०२ एप्रिल रोजी गुळवंची गांव येथे मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले.

या आरोग्य शिबिरात ग्रामस्थांना आपल्या रुग्णाची काळजी घेण्याबाबत जनजागृती करून त्यांच्या मुख आरोग्य,  थायरॉईड,  मोतीबिंदू, स्तन कर्करोग, स्थूलता जनजागृती, थलेसेमिया हे मोफत तपासण्या करण्यात आल्या. तसेच अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली आणि फॉर्म भरण्यात आले.  यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात ग्रामस्थांनी रक्तदान केले. 

सिव्हील हॉस्पिटल सर्जरी विभागाचे डॉ. ए. एन. मस्के, स्त्री रोग तज्ञ डॉ. तिरंकर मॅडम, कम्युनिटी मेडिसिनचे डॉ. जगती व डॉ. जयश्री किस्ते यांनी या शिबिरात ग्रामस्थांच्या तपासणी केल्या. तसेच रक्तदानात डॉ. गवळी मॅडम, डॉ. प्रतिमा लालीकर, डॉ. प्राजक्ता गिरी, डॉ. कुलकर्णी मॅडम यांनी आपली सेवा यशस्वीपणे पार पाडली. यावेळी डॉ. मस्के, सरपंच सुनील जाधव यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

या आरोग्य तपासणी यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष रो. रविराज दरेकर, सचिव रो. अकबर नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली रो. महेश साळुंके, नागेश शेंडगे, बसवराज बिराजदार यांनी हे शिबिर यशस्वीपणे राबविले. 

यावेळी सरपंच सुनील जाधव, विष्णू भोसले, सुहास भोसले, मुकुंद कदम, सत्यजित देशमुख, अनिल बोराडे, अंकुश शिंदे, अमोल बोराडे, बचत गट प्रमुख विजया बोराडे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. 

कार्यक्रमाची प्रास्ताविक रो. महेश साळुंके यांनी केले. सुत्रसंचालन सुहास भोसले यांनी व रो. नागेश शेंडगे यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.  

To Top