Type Here to Get Search Results !

डॉ. बसवराज सुतार यांच्या हृदय स्पंदन हार्ट केअरचं खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

सोलापूर : येथील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या श्री जय भवानी मेडिकल शेजारी डॉ. बसवराज सुतार यांच्या हृदय स्पंदन हार्ट केअर चं रविवारी, 06 एप्रिल रोजी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या हार्ट केअर सेंटरचे कौतुक करून रुग्णांना जास्तीत-जास्त चांगली सेवा या ठिकाणी मिळेल, अशी अपेक्षा खासदार शिंदे यांनी मनोगतात व्यक्त केली. 

यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक चेतन नरोटे, डॉ. सुतार, डॉ. उमाश्री सुतार, स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना अक्कलकोटचे चेअरमन संजीवकुमार पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ भरमशेट्टी, येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे, अमोल भोसले आदी उपस्थित होते. 

प्रारंभी फीत कापून हृदय स्पंदन चे उद्घाटन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. सुतार यांनी हृदय स्पंदन या हार्ट केअर ची माहिती प्रास्ताविकात दिली.

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी देखील उपस्थित राहून डॉ. सुतार यांच्या अनुभवाचे कौतुक केले. त्यांच्या हातून रुग्णांना चांगली सेवा मिळावी, अशी सदिच्छा व्यक्त केली.  यावेळी विश्वनाथ भरमशेट्टी, अरुण भरमशेट्टी, अप्पू हाताळे, अप्पाशा भरमशेट्टी, यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. सुतार हे अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर सुपुत्र असल्यामुळे हन्नूर, चपळगाव तसेच अक्कलकोट तालुक्यातील विविध गावातून आणि सोलापूर शहरातून विविध मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास, चपळगावचे सरपंच सिद्धाराम भंडारकवठे, अक्कलकोट पंचायत समितीचे माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड, गोटू मंगरुळे, चिनू पाटील, प्रा. निलेश भरमशेट्टी, चंद्रकांत रोटे, गुरुपादप्पा बिडवे, आकाश भरमशेट्टी, विनोद भोसले, नरेंद्र जंगले, सोपान निकते, सिद्धाराम हेले, नीलपा घोडके आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या शिबारे, संगीता हिरवाडकर यांनी केले.