Type Here to Get Search Results !

चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी

धाराशिव : अखंड भारताचे सम्राट, धम्मदायाद, चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३२९ वी जयंती चैत्र शुक्ल अष्टमी, शनिवारी, ५ एप्रिल रोजी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी, समता सैनिक व बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


कार्यक्रमाच्या प्रारंभी रमाई स्मारकाला व त्याच स्मारकावर मुद्रित केलेल्या सम्राट अशोक यांच्या राज आज्ञेला, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय बौद्ध महासभा धाराशिव दक्षिण चे पदाधिकारी यांच्या वतीने करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले. 

त्यानंतर बौद्धाचार्य गुणवंत सोनावणे, बौद्ध महासभा जिल्हा उपाध्यक्ष महिला विभागाच्या शिला चंदनशिवे, अखिल भारतीय जिवा सेनेचे नामदेव वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस विजय बनसोडे यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर सरणतंय गाथा घेण्यात आली. 

यावेळी बौद्ध महासभेचे धाराशिव जिल्हा संघटक बाबासाहेब बनसोडे, बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष विजयमाला धावारे,  रमाई फौंडेशन चे पृथ्वीराज चिलवंत, सभेचे जिल्हा कार्यालयीन सचिव किरण धाकतोडे,  मनोरमा काटे, स्वराज जानराव, आनंद गाडे, संतोष झेंडे, धम्मपाल शिंगाडे, प्रतिक चंदनशिवे, सुधीर वाघमारे, संतोष बनसोडे, प्रशांत पांडागळे, दीपक धावारे, आकाश भालेराव तसेच भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी, समता सैनिक व बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव सचिन दिलपाक यांनी सर्व उपस्थितांचं आभार व्यक्त केले. यावेळी मिठाईचंही वाटप करण्यात आले.