सोलापूर : तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबाबतच्या विषयावर व कार्यक्रमावर व त्या अनुषंगाने आर्थिक तरतुदीबाबत चर्चा करण्यासाठी पंचायत समिती बार्शी सन 2024-2025 आमसभा शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, भाजी मंडई शेजारी, बार्शी येथे आयोजित केलेली आहे.
ही आमसभा आमदार दिलीप गंगाधर सोपल, विधानसभा सदस्य बार्शी मतदार संघ यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ़ पवनराजे निंबाळकर, सदस्य, लोकसभा मतदार संघ धाराशिव यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केली असून सदर आमसभेसाठी शासनाच्या सर्व विभागाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, तरी आमसभेमध्ये चर्चा करावयाच्या सुचना/प्रश्न दिनांक 09 एप्रिलपर्यंत पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन पंचायत समिती बार्शीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी, महेश सुळे यांनी केले आहे.