महाराष्ट्रात मराठीच ! या परिपत्रकाची म. न. से. ने करून दिली बँक शाखाधिकाऱ्यांना आठवण

shivrajya patra

सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने राज ठाकरे यांच्या आदेशावरून गुरुवारी सोलापूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सोलापूर जिल्हा अग्रणी बँक, सर्व बँकांच्या शाखाधिकार्‍यांची भेट घेऊन आपल्या आस्थापनामध्ये बँकेमध्ये सर्व व्यवहार मराठीमध्ये व्हावेत, ज्या-त्या राज्यामध्ये तेथील भाषेमध्येच व्यवहार व्हावेत, अशा प्रकारचं परिपत्रक भारतीय रिझर्व बँकेने 2014 मध्ये काढलेले आहे, याची आठवण बँक शाखाधिकार्‍यांना करून देण्यात आली. 

लवकरात लवकर आपल्या बँकेतील सर्वच कामकाज महाराष्ट्राची राज्यभाषा मराठीमध्ये करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच यावेळी बँकेच्या दर्शनी भागामध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य आहे. अशा आशयाचे फलक बँकेच्या शाखाधिकाऱ्यांच्या हस्ते लावण्यात आले. 

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोषकुमार घोडके, वाहतूक सेना जिल्हा संघटक प्रसाद कुमठेकर, वाहतूक सेना सोलापूर शहर संघटक जितू टेंभुर्णीकर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे, शहर उपाध्यक्ष पवन देसाई, वैभव रंपुरे, आकाश निंबाळकर, अक्षय आडम, नितीन पंजाबी, समर्थ माळगे, अभिषेक इरकल, हणमंतु घंटे, सुमित अंबुरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक उपस्थित होते.

To Top