Type Here to Get Search Results !

डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूक बंदोबस्तासाठी १, ७०० पोलीस अधिकारी- कर्मचारी तैनात

सोलापूर : शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांतता प्रस्थापित व्हावी याकरीता पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी भारतररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सांगता मिरवणुकीसाठी १६९२ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस बलाची एक तुकडी तैनात करण्यात आली असल्याची माहिती दिलीय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, १४ एप्रिल रोजी शहरातील अनेक मंडळांनी  प्रतिमा/मुर्तीची प्रतिष्ठापना केलीय. रविवारी, २० एप्रिल रोजी जयंती उत्सव सांगता मिरवणुका निघणार आहेत. मिरवणूक काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, याचा खबरदारी म्हणून जवळपास १,७०० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे. 

सोलापूर शहरात २५ ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहेत. मिरवणुक मार्गावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच पोलीस पेट्रोलींग नेमण्यात आलेली आहे. वाहतुकीची कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून, शहर वाहतुक शाखेकडील पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यापूर्वीच शहरातील मिरवणूक मार्गावरील वाहतुक बंद करण्याचे आदेश पारित करण्यात आले असून या मार्गावरील वाहतुक अन्य मार्गावर वळविण्यात आलीय.

मिरवणूक बंदोबस्तात पोलीस आयुक्त ०१, पोलीस उप आयुक्त ०३,सहा. पोलीस आयुक्त ०५,पोलीस निरीक्षक २३, सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उप निरीक्षक ६०,पोलीस अंमलदार ११००, होमगार्ड ५०० आणि SRPF ०१ कंपनी असणार आहे.