जिल्हा नियोजन व विकास निधीतून प्राप्त ११ वाहनांचा लोकार्पण सोहळा; पालकमंत्र्यांनी दाखविला हिरवा झेंडा

shivrajya patra

सोलापूर : पोलीस आयुक्तालय सोलापूर येथे जिल्हा नियोजन व विकास निधी २०२४-२०२५ वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर शासकीय निधीतून पोलीस दलास देण्यात आलेल्या ११ वाहनांचा लोकार्पण कार्यक्रम सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी, ३ एप्रिल रोजी पार पडला.

कार्यक्रमाप्रसंगी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस विभागातील समस्या व अडचणी संदर्भात मार्गदर्शन केले.

या लोकार्पण सोहळा समारंभाकरीता ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे,  सोलापूर मध्य मतदार संघाचे आमदार देवेंद्र कोठे, पोलीस आयुक्त एम राज. कुमार, पोलीस उप-आयुक्त अजित बोऱ्हाडे, पोलीस उप आयुक्त डॉ. दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त विजय कबाडे तसेच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते.

To Top