बहुजन शिक्षक महासंघाने मिळवून दिला शिक्षिकेला शालार्थ आयडी; महासंघाच्यावतीने आनंदोत्सव मेळावा

shivrajya patra

सोलापूर : महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या मोहोळ तालुक्यातील सभासद व महात्मा गांधी विद्यालय, पेनुर ता. मोहोळ या प्रशालेतील सहशिक्षिका स्वप्नजा कसबे यांना महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर व राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रलंबित शालार्थ आयडी शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे यांच्याकडून मिळवून दिला. यानिमित्ताने बहुजन शिक्षक महासंघाच्यावतीने आनंदोत्सव मेळावा साजरा करण्यात आला.

पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक तथा राज्याचे शिक्षण सहसंचालक हारूण आतार, शिक्षण अधिकारी सचिन जगताप, संस्थाचालक प्रकाशचंद्र कस्तुरे, मुख्याध्यापक कृष्णा चवरे, संस्थाचालक सुप्रिया देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळे कसबे यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा होऊन त्यांच्यावरील अन्याय दूर केलेला आहे. यानिमित्ताने नव्या पेठेतील बौद्ध साहित्य संमेलन संपर्क कार्यालयात महासंघाच्या पदाधिकारी यांच्या समवेत कसबे कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा केला. 

यावेळी जिल्हा सचिव रवी देवकर, जिल्हा संघटक सिद्धेश्वर भुरले, शहराध्यक्ष संजयकुमार शिवशरण, निर्मला मोळे, प्रिया कदम, कविता कदम, महानंदा शिंदे, शिवानंद चौगुले, आगतराव बनसोडे, रत्नदीप कांबळे, एकोराम चौगुले, डॉ. श्रृतिका उडानशिव, प्रा. अभिजीत भंडारे, इन्नूस बाळगी, नागेश सातपुते तसेच कसबे आणि उडानशिव कुटुंबीय आदींची उपस्थिती होती. 

प्रारंभी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर व बौद्ध साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार किरण बनसोडे यांच्या हस्ते स्वप्नजा कसबे यांना शालार्थ आदेश देऊन शुभेच्छा दिल्या.

तद्नंतर बौद्ध साहित्य संमेलनाचे कार्यवाह भालचंद्र साखरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल महासंघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ कविवर्य देवेंद्र औटी व प्रा. अभिजीत भंडारे यांच्या स्वरचित कवितेच्या सादरीकरणाने हा आनंदोत्सव मेळाव्याचे समारोप करण्यात आले.

To Top