सोलापूर : येथील गैबीपीर उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये शुक्रवारी, ११ एप्रिल रोजी क्रांतीज्योती महात्मा ज्योतीराव फुले जयंती साजरा करण्यात आली. फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष हाजी के. बी. नदाफ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 
प्रारंभी धनंजय झाकर्डे यांच्या हस्ते महात्मा ज्योतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास बामसेफचे राज्य कार्यकारणी सदस्य संजय आबुटे, मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व मर्चंट नेव्ही ऑफीसर विश्वनाथ गायकवाड, सांची फिल्म मेकर फोटो ग्राफर अमोल वाघमारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. त्यात धनंजय झाकर्डे, संजय आबुटे, विश्वनाथ गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महात्मा फुले यांच्या अतुलनिय कार्याला उजाळा दिला.
शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांची वेशभूषा मध्ये कायर्क्रमात उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी के. बी. नदाफ यांनी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. शाळेचे मुख्याध्पाक अ. मजीद शेख यांनी पाहुण्यांचं आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलोफर शेख, शबाना जमादार, तेहसीन चांदा, अकबर मुतवल्ली, सलमा नदाफ, शब्बीर शेख, आफरीन शेख, गौसिया मुछाले, सालेहा शेख आदींनी परिश्रम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसर्त शेख यांनी केले.
