सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी, 21 एप्रिल 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोमवारी, 21 एप्रिल रोजी दुपारी 12.00 वाजता दरे हेलिपॅड येथून शासकीय हेलिकॉप्टर ने माढा जिल्हा सोलापूर कडे प्रयाण. दुपारी 12.45 वा. रयत शिक्षण संस्था मैदान हेलिपॅड माढा येथे आगमन व मोटारीने शेटफळ रोड ता. माढा कडे प्रयाण. दुपारी 01.00 वा. राजीव ॲग्रो ऑईल इंडस्ट्रीज प्रा. लि भूमिपुजन सोहळ्यास उपस्थिती.
दुपारी 01.30 वा. शिवसेना पक्षाची जाहिर सभा व मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 02.45 वा. मोटारीने रयत शिक्षण संस्था मैदान हेलिपॅड कडे प्रयाण. दुपारी 03.00 वा. रयत शिक्षण संस्था मैदान हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 03.30 वा सोलापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबई कडे प्रयाण करतील.