सोलापूर : येथील वसंत विहार, गायत्री नगरातील रहिवासी श्रीमती रत्नमाला श्रीरंग जळकोटकर यांचं अल्पशः आजाराने शुक्रवारी रात्री ०९ वाजता निधन झालंय. त्या मृत्यूसमयी ७५ वर्षीय होत्या.
त्यांची अंत्ययात्रा राहत्या निवास स्थानापासून निघून शनिवारी, १५ मार्च रोजी दुपारी १२.०० वा पुना नाका, स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या 'लोकमत' चे उपवृत्तसंपादक विलास जळकोटकर यांच्या मातोश्री होत.