सोलापूर : सेवानिवृत्त पोलीस हवालदार इक्बाल हाजी इब्राहिम शेख यांचा नातू तैमूर तौसीफ शेख या ०६ वर्षीय बालकाने रमजान महिन्यातील आपला पहिला रोजा शुक्रवारी, १४ मार्च रोजी पूर्ण केला. सायंकाळी रोजा इफ्तार वेळी तैमूर शेख याचा गोडधोड खाऊ घालून व पुष्पहार घालून त्याची गुलपोशी करण्यात आली.
तैमूर हा दत्त नगर येथील ब्राहो किड्स शाळेत यु केजी मध्ये शिकण्यास आहे. लहान वयात भर उन्हाळ्यात रोजा पूर्ण केल्यामुळे आई-वडील ,आजी आजोबा व नातेवाईकांनी तैमूर याचं कौतुक करून त्याला शुभाशीर्वाद दिला आहे.