नूर शेख याने पूर्ण केला रमजानचा पहिला रोजा

shivrajya patra

सोलापूर : येथील सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार सलाउद्दीन रमजानसाब शेख यांचा नातू  नूर सिराज शेख या बालकानं रमजान महिन्यातील आपला पहिला रोजा शुक्रवारी, 7 मार्च रोजी पूर्ण केला.

सायंकाळी रोजा इफ्तारवेळी नूर शेख याचा गोड-धोड खाऊ घालून व पुष्पहार घालून त्याची गुलपोशी करण्यात आली. नूर हा येथील अहिल्याबाई शाळेत चौथ्या इयत्तेत शिकण्यास आहे.

लहान वयात भर उन्हाळ्यात रोजा पूर्ण केल्यामुळे  आई-वडील, आजी-आजोबा व  नातेवाईकांनी नूर याचं कौतुक करून त्याला शुभाशीर्वाद दिला आहे.

To Top