नवी दिल्ली येथे 09 मार्च रोजी महाराष्ट्र सदनात होणार सन्मान सोहळा
उत्तर सोलापूर/कय्युम जमादार : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन नवी दिल्लीतर्फे रविवारी, 09 मार्च रोजी महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे डॉ. माधुरी भोसले यांना राष्ट्रीय नारीशक्ती सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील महिलांचा यावेळी सन्मान केला जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून डॉ. माधुरी भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षा विजया रहाटकर, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
डॉ. मनीष गवई, सुरेखा लांबतुरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती मार्डी, मुख्याध्यापक संतोष साळुंखे सर्व शिक्षक वृंद यांच्यासह सर्व स्तरातून राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
