महात्मा बसवेश्वर पुतळा शुशोभीकरणाचं काम व्हावं अक्षय तृतियेपूर्वी पूर्ण : आमदार देशमुख

shivrajya patra

सोलापूर : अक्षय तृतियेला महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती सोलापूर शहर-परिसरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सद्या पालिका प्रशासनाकडून पुतळा परिसरात सुशोभीकरणाचे काम चालू आहे, ते त्वरित पूर्ण करावं, पुतळ्याच्या परिसरात लाईट बसवावेत, रंगरंगोटी करून घ्यावी  आणि अक्षय तृतियापूर्वी पुतळा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जावी, अशा सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना दिल्या.


महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवापूर्वी कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास आमदार विजयकुमार देशमुख आणि पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी भेट देऊन पुतळा परिसराची पहाणी केली. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख बोलत होते.

यावेळी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे, माजी नगरसेवक अमर पुदाले, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक नागेश भोगडे, देविदास बनसोडे, बसवराज चाकोई, श्रीकांत कट्टिमणी, अमित कलशेट्टी, दर्गोपाटील, विजापुरे, संतोष जम्मा आदी उपस्थित होते.

To Top