विद्यापीठात छत्रपती शंभू राजे साहित्य पुरस्कार प्रथमच सुरू

shivrajya patra

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात जिल्ह्यातील साहित्यिकांची मागणी व मागणीचा मुद्दा मांडणारे सिनेट सदस्य सचिन गायकवाड यांनी सतत पाठपुरावा व पत्रव्यवहार करणारे कविवर्य रामप्रभू माने व संध्या धर्माधिकारी याच्या प्रयत्नाला यश मिळाले असून छत्रपती संभाजी राजे नावाने पुरस्कार वितरण कार्यक्रम विद्यापीठात पार पडला. 

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी साहित्यातील छत्रपती शंभूराजे नावाने पुरस्कार चालू करावेत, यासाठी सोलापुरातील साहित्यिक रामप्रभू माने व इतर अनेक साहित्यिकांनी कुलगुरू यांचेकडे लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. यावेळी सोलापूरातील साहित्यिक रामप्रभू माने, संध्या धर्माधिकारी, डी. एन. जमादार, भगवान चौगुले उपस्थित होते.

सर्व सोलापूरातील 85 साहित्यिकांच्या स्वाक्षरीसह च्या व समक्ष उपस्थित 35 साहित्यिकांच्या विनंतीवरून क्रांतिकारक निर्णय घेतला, त्याबद्दल विद्यापीठ प्रभारी कुलगुरू डॉ. दामा व सचिन गायकवाड यांचा साहित्यिक रामप्रभू माने, संध्या धर्माधिकारी, भगवान चौगुले, डी. एन, जमादार यांनी सत्कार केला.

To Top