सौ. इनामदार यांचं शैक्षणिक कार्याबरोबरच साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही उल्लेखनिय कार्य : रफीक खान

shivrajya patra

सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभात सौ. हाजराबेगम इनामदार यांचा गौरव 

सोलापूर : सौ. हाजराबेगम इनामदार यांनी आपल्या सेवाकालात शैक्षणिक कार्याबरोबरच साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केले. त्यांचं कार्य  गौरवास्पद आहे. त्या संपूर्ण जिल्ह्यात तज्ञ मार्गदर्शन म्हणूनही सुपरिचित आहेत, असे गौरवोद्गार रफीक खान यांनी काढले.

साखर पेठ येथील अंजुमन-ए-इस्लाम उर्दू प्राथमिक शाळेची उत्कृष्ट मुख्याध्यापिका सौ. हाजराबेगम इनामदार आपला ३३ वर्षांचा सेवा यशस्वीरित्या पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्या. त्यांना निरोप देण्यासाठी शाळेच्यावतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात स्कूल बोर्डाचे माजी सुपरवायझर रफिक खान यांच्या अध्यक्षस्थानी होते.

या समारंभास अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचे सचिव बशीरअहमद शेख, इकरारअली एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष खलीलअहमद नालबंद, मौलाना आझाद उर्दू प्रशालेचे मुख्याध्यापक इरफान केरूल यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रफिक खान बोलत होते.

संस्थेच्या अध्यक्षा सौ. रशिदाबानो शेख यांच्या हस्ते सौ. हाजरा इनामदार यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी जरिन शेख, मुश्ताक कान्कुर्ती, चाँद सुलताना, सादिक शेख, गौस कुरेशी, हुसेनबाशा नल्लामंदू, लालकोट उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नफीसा जमखंडी यांनी केले तर नफीसा शेख यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.

To Top