महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली प्रदर्शन

shivrajya patra


भंडारा/प्रतिनिधी : ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झाले. त्या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट अशोक महापराक्रमी राज्याने महाबोधी महाविहार बांधले होते, ते ठिकाण युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे, मात्र या पवित्र जागेवर परकीय पर धर्मियांचा अवैध ताबा आहे. त्यामुळे जागतिक बौद्ध धम्मा ला अनुसरणाऱ्या जनतेच्या भावना दुखावल्या जातात, भारत हा सर्वधर्म समभाव असणारा देश असून सुद्धा असा भेदभाव होत असल्याने भारताच्या 31 राज्यात 565 जिल्ह्यातील 22 हजार विभागातील 6 लाख गावातील जनतेच्या पाठींब्याने देशव्यापी चरणबद्ध आंदोलनाचे आयोजन केले होते.
महाबोधी महाविहार टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करून भारतीय बौद्ध आणि जागतिक बौद्ध यांना विस्वासात घेऊन नवीन बौद्ध कायदा निर्माण करून महाबोधी महाविहार बौद्ध लोकांना द्यावा, अशा अनेक मागण्याकडे लक्ष वेधले जावे, यासाठी पाच चरणात देशव्यापी चरणबद्ध आंदोलनाचे आयोजनाचा भाग म्हणून, पहिल्या टप्प्यात 03 मार्च ला जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती ला निवेदन देण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यात 08 मार्च ला जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणा प्रदर्शन केले , तिसऱ्या टप्प्यात 22 मार्च ला जिल्हा मुख्यालय वर रॅली प्रदर्शन करण्यात आले. शास्त्री चौकातून रॅली ला सुरुवात करण्यात आली, गांधी चौक ते पोस्ट ऑफिस चौक ते त्रिमूर्ती चौक असा रॅली चा मार्ग होता. रॅलीत मोठ्या संख्येने हजारो लोक नारे देत उपस्थित होते.

""निकलो बहार मकानो से-जंग लढो बैमानो से"" ,""एस सी, एस टी, ओबीसी-भारत के है मूलनिवासी "", बुद्ध के शांती के लिये एक बार क्रांती, युद्ध नको बुद्ध हवा,  अशा नाऱ्यानी परिसर दुमदुमून सोडला.

09 एप्रिल ला भारत भर जेल भरो, आणि 01 जुलै ला भारत बंद चे आयोजन केले आहे. कार्यक्रमाला बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे जिल्हा अध्यक्ष भारत बन्सोड, कार्याध्यक्ष दिनबंधु मेश्राम, रविदास लोखंडे (भारत मुक्ती मोर्चा),  सुभाष भिवगडे  (बहुजन मुक्ती पार्टी), विजयकांत बडगे (SCF), परमानंद मेश्राम सामाजिक कार्यकर्ते, शरयू डहाट, मूलनिवासी महिला संघ, अभय रंगारी (BIN) आणि असंख्य लोग उपस्थित होते.

09 एप्रिल ला जेल भरो, 01 जुलै ला भारत बंद ला सुद्धा असेच साथ समर्थन द्यावं, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

To Top